आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️टेंपोच्या धडकेत दुचाकीस्वार एक ठार तर दोनजण जखमी..

 

मुख्य संपादक : श्री. तुळशीराम जांभुळकर

आळेफाटा – ( इंडिया 24 न्युज ) : ओतूर ते धोलवड (ता.जुन्नर) रस्त्यावर टेम्पो व दुचाकीस्वार यांच्या झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती ओतूर पोलिस सूत्रांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ओतूर पोलिस म्हणाले की,ओतूरच्या दिशेने आलेला टेंपो क्रमांक (एम एच १२ एस एक्स ६९९७ ) ने दुचाकी क्रमांक( एम एच १६ए एफ ५२४५) ला धडक दिली असून या अपघातात किशोर यशवंत कडाळे राहणार वनकूटे, ता. संगमनेर यांचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे समवेत असलेले नामदेव भले आणि संदीप केदार हे गंभीररित्या जखमी झाल्याने ओतूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश पटारे, भरत सूर्यवंशी, नामदेव बांबळे, संदीप लांडे, संदीप भोते, शाम सुंदर जायभाये हे हजर झाले व अपघात स्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान टेम्पो चालक हा अल्पवयीन असून अपघातग्रस्त तिघे दुचाकीस्वार रस्त्याचे कडेला दुचाकी उभी करून गप्पा मारीत होते,अचानक टेम्पो ने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. अपघातानंतर टेम्पो पलटी झाला असून ओतूर पोलिसांनी अल्पवयीन चालक ताब्यात घेतला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.