ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अजितदादा पवारांनी सत्तेचा वापर स्वार्थासाठी नसून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी. पंडितभाऊ दाभाडे

▪️बहुजन जनता दलाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना श्रद्धांजली..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

पुणे – ( इंडिया 24 न्युज ) : दि. पुरोगामी विचाराचे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार हे राज्यातील शिस्तबद्ध व मनमिळावू तर दूरदृष्टी असलेले राज्याचे खंबीर नेतृत्व होते भविष्यात राज्याचे आणि देशाचे नेतृत्व करण्याची पूर्ण त्यांना माहिती होती आणि क्षमताही होती अजितदादा पवारांनी सत्तेचा वापर कधीही स्वार्थासाठी केला नसून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला हे त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून आणि आपल्या कृतीतून महाराष्ट्राला दाखवून दिले असे भावपूर्व उद्धार पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी काढले
बहुजन जनता दल पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी बहुजन जनता दलाच्या पुणे येथील मध्यवर्ती केंद्रीय कार्यालयात आयोजित अजितदादा पवार यांच्या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल बोलत होते
अजितदादा पवारांनी राज्याला प्रगती कडे नेण्यासाठी शेती आणि औद्योगीकरण शिक्षण या क्षेत्राच्या विकासाचा जो पायडा पाडला त्यांनी कधीही पुरोगामी विचारधारा सोडली नाही सत्तेचा वापर लोक हितासाठी कसा करावा हे त्यांच्या आजपर्यंत कामाच्या माध्यमातून दाखवून दिले आगामी काळात कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्यांचा आदर्श व अनुकरण करावे असेही पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी म्हटले आहे
बहुजन जनता दलाच्या शोकसभेला प्रमुख्याने दादाराव वानखडे अभय राठोड कीशोर सांगे अंकुश पवार दादाराव जाधव दिलीप इंगळे केशव गंगणे गणेश तांबे बलदेव भोसले महेंद्र शिंदे अब्दुल सत्तार शेख सलीम अली दिपक पाटील संजय क्षीरसागर किशोर कदम महेश कुलकर्णी तुकाराम गावंडे चंदुलाल काळपट अब्दुल रहमान उमेश कामत यांच्यासह बहुजन जनता दलाचे पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते असे बहुजन जनता दलाच्या केंद्रीय मध्यवर्ती कारल्याकडून कळविण्यात आले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.