आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️भद्रावती येथील एका व्यावसायिकाची फसवणूक करुन दोन ट्रक हडप करुन तुकडे करणाऱ्याचा पर्दाफाश..

▪️पोलीस स्टेशन घुग्घुस ची मोठी कामगिरी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

भद्रावती – ( इंडिया 24 न्युज ) येथील एका व्यावसायिकाची फसवणूक करून दोन ट्रक हडप करणाऱ्या आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे तुकडे करणाऱ्यांचा घुग्घुस पोलिसांनी यशस्वीरीत्या छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपूर येथून एका आरोपीला ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी सध्या छत्तीसगड पोलिसांच्या कोठडीत आहे.

फिर्यादी गोविंद अतुल कुंडू (रा. भद्रावती) यांच्या मालकीचे दोन टाटा डंपर (क्रमांक MH-29-BE-1656, MH-29-BE-1657) आरोपी साबीर अली सिराजउद्दीन सय्यद (रा. घुग्घुस) याने खरेदी करण्याच्या बहाण्याने नोटरीद्वारे ताब्यात घेतले होते. मात्र, ठरलेली रक्कम न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली व ट्रक लंपास केले. या तक्रारीवरून घुग्घुस पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी साबीर अली सिराजुद्दीन सय्यद याने हे ट्रक नागपूर येथील जिया उर रहमान उर्फ जिया अन्सारी याच्या ताब्यात दिल्याचे निष्पन्न झाले. घुग्घुस पोलिसांच्या पथकाने नागपूर येथे छापा टाकून जिया अन्सारी याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली की, साबीर अली याच्या सांगण्यावरून त्याने दोन्ही ट्रक गॅस कटरने कापून त्याचे तुकडे केले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी ट्रकचे चेसिस तुकडे, टायर, ऑईल टाकी, फायबर बोनेट व इतर अवशेष जप्त केले आहेत. आरोपी साबीर अली सिराजुद्दीन सय्यद याने छत्तीसगड राज्यातही असेच गुन्हे केले असल्याने, तो सध्या छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात आहे. तर नागपूर येथील आरोपी जिया अन्सारी याने गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला असून, त्याचा या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे.

सदरची कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तायवडे यांच्या मदतीने तपासाची यशस्वी अंमलबजावणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस शिपाई परमेश्वर डोईफोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन

वाहन मालकांनी आपले ट्रक किंवा इतर वाहने भाड्याने देताना किंवा विकताना विशेष सावधानता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात येत असुन फसवणूक टाळण्यासाठी

१) गाडी विकताना केवळ नोटरीवर विसंबून न राहता, संबंधित बँकेचे कर्ज (Loan) अधिकृतपणे खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यावे.

२) पार्श्वभूमी तपासणेः खरेदीदार किंवा भाड्याने घेणारी व्यक्ती कोण आहे, त्याचा पत्ता आणि व्यवसायाची खात्री करून घ्यावी. ३) सिबिल (CIBIL) पडताळणीः व्यवहार करण्यापूर्वी खरेदीदाराची आर्थिक पत आणि सिबिल स्कोर तपासूनच व्यवहार करावा. ४) अधिकृत प्रक्रियाः आरटीओ (RTO) कडील कायदेशीर हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय वाहन दुसऱ्याच्या स्वाधीन करू नये.

अशा प्रकारची सतर्कता बाळगल्यास भविष्यातील मोठे आर्थिक नुकसान आणि कायदेशीर कटकटी टाळता येतील.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.