▪️पुस्कोटी गावात महिनाभरानंतर वीज; CPI च्या पाठपुराव्याला यश

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
एटापल्ली : ग्रामपंचायत वांगेतुरी अंतर्गत पुस्कोटी गावात गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठा बंद होता. नागरिकांनी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे मदतीची मागणी केली.
कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली CPI ने महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना प्रत्यक्ष पुस्कोटी गावात नेले. एटापल्लीपासून सुमारे ६० किमी दूर असलेल्या या दुर्गम गावात वाहनाचा रस्ता नसल्याने उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता व त्यांच्या टीमसह CPI कार्यकर्त्यांनी ३ किमी पायी चालत गाव गाठले.
यावेळी कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य, CPI कार्यकर्ते आणि गावातील नागरिक उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अवघ्या एका तासात गावातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
“कार्यालयात बसून जनतेच्या अडचणी पूर्णपणे समजत नाहीत, म्हणून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष गावात आणले. नागरिकांच्या संघर्षाला यश मिळाले,” असे कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले.
CPI ने वीजपुरवठा बंद राहण्याची कारणे तपासून जबाबदारी निश्चित करावी आणि झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी केली आहे.



