आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते गडचिरोलीत विविध ठिकाणी उत्साहात ध्वजारोहण..

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल‌ देवनाथ

गडचिरोली – दि. १५ ऑगस्ट २०२६ भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त गडचिरोली शहरात देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना ओसंडून वाहत असताना, भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळे पार पडले.

सर्वप्रथम डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या संस्थेच्या शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी तंबाखू मुक्त करूया अशी शपथ घेतली. विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर चामोर्शी रोड येथील डॉ. नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ कार्यालयात तसेच जनजाती विकास समिती, गडचिरोली येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमांना डॉ. अशोकजी नेते यांनी विशेष उपस्थिती लावत राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. यासोबतच त्यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, कि.मो.प्र. स. रमेश भुरसे, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते,शहर अध्यक्ष तथा सभापती अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, डॉ. भारत खटी, प्रमोद पिपरे,गजानन येनगंदलवार, अनिल पोहनकर, महामंत्री प्रकाश गेडाम, डॉ. चंदाताई कोडवते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, शहराध्यक्ष तथा न.प. सभापती सीमा कन्नमवार, सभापती हर्षल गेडाम, जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके,अर्चना निंबोड, नगरसेविका साक्षी बोलूवार, शिल्पा गव्हारे, ज्ञानेश्वरी धंदरे, सुधाकरजी येनगंदलवार,घनश्याम वाढई, देवाजी लाटकर, केशव निंबोड,दतु माकोडे,श्रीकांत पतरंगे, यांच्यासह शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

जनजाती विकास समितीचे तथा गडचिरोली नगर स्वयंसेवक नीलकंठ भांडेकर, सचिव विकास वडडेटीवार, परमानंद पुण्यमवार,निखिल सुंदरकर,रविंद्रजी भांडेकर, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून, राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य, राष्ट्रनिष्ठा आणि देशसेवेचा संकल्प करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.