आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक : २०२६!
▪️भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजितजी वंजारी यांच्या नामांकन अर्ज दाखल..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजितजी वंजारी यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नागपूर विभागातील पदवीधर मतदार, काँग्रेस पक्षाचे खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार , काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर भव्य प्रचार सभेचा यशस्वी शुभारंभ करण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



