▪️महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी तक्रारीकरीता 24×7 हेल्पलाइन कार्यान्वित..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : ९ ऑक्टोबर २०२६: महाराष्ट्र शासनाकडून राज्यात यावर्षि अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील ३५८ तालुक्यापैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. महावितरणकडून राज्यात सुमारे ४७ लाखांवर कृषी ग्राहकांना विविध क्षमतेच्या वितरण रोहित्रांद्वारे वीजपुरवठा केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत हा वीजपुरवठा सुरळीत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वीज यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश दिले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील रोहित्र बिघाड व इतर तातडीच्या वीज विषयक तक्रारीची त्वरीत नोंद घेण्याकरीता महावितरण कर्मचाऱ्यांशी याबाबत समन्वय साधून सदर तक्रारीचे निराकरण करण्याकरीता संबंधित अधीक्षक अभियंता महावितरण चंद्रपूर मंडळ, चंद्रपूर यांचे कार्यालयात जिल्हा स्तरावर 24×7 हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. शेतकऱ्यांना तक्रारीकरीता 787576199 हा सदर क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.



