आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्हा काँग्रेस निवड मंडळाची बैठक संपन्न..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी जिल्हा निवड मंडळाची भव्य बैठक साई सेलिब्रेशन हॉल, चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
कुख्यात आरोपींकडून 5 मोटारसायकल जप्त
या बैठकीत जिल्हा निवड मंडळाचे सन्माननीय सदस्य तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ. विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतीक्षाताई धानोरकर, जिल्हा काँग्रेस प्रभारी आ. अभीजीत वंजारी, जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, माजी आमदार अविनाश वारजुरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, माजी जि. प. अध्यक्ष सतिश वारजुरकर, विधानसभा प्रभारी संजय दुबे, हैदर अली दोसानी, मुजीब पठाण, प्रविण पडवेकर, प्रविण काकडे, गुरूदास गुरूनुले, विजय गावंडे, देवेंद्र आर्या, रंजन लांडे, उत्तमराव पेचे, विलास टिपले, मिलिंद भोयर, प्रमोद चौधरी, खेमराज तिडके, अनिल नरुले, प्रशांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी काँग्रेसकडून उमेदवारी इच्छुकांनी सादर केलेल्या अर्जांचा सखोल आढावा घेण्यात आला. उमेदवारांच्या कार्याचा अहवाल, सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क, संघटनात्मक निष्ठा या बाबींचा विचार करून मुलाखती घेण्यात आल्या.
या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाच्या संघटनशक्तीचे प्रदर्शन केले. बैठकीचे संयोजन व नियोजन अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडले असून आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचा दृढ विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.