▪️झुडपी जंगल क्षेत्राच्या नियमितीकरणासाठी उचलले पाऊल..
▪️जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आरमोरी धानोय्यात पाहणी..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ): सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाकडे झुडपी जंगल में म्हणून अधिसूचित झालेले क्षेत्र वन विभागाच्या यादीतून कमी ( डी-नोटिफाय ) करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलदगती कार्यवाही सूरु केली आहे
विशेषत, दिनांक १२ डिसेंबर १९९६ पूर्वी वाटपाद्वारे हस्तांतरित झालेले तसेच या तारीखें पूर्वी अतिक्रमित असलेले क्षेत्र नियमित करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे या संदर्भात आवश्यक असलेला जिलाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांचा संयुक्त चौकशी अहवाल सादर करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून, जिल्हाधिकारी अविश्यांतपंडाव उपवन संरक्षक आर्यायांनी आरमोरी व धानोरा तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली
जिल्हाधिकाय्यांनी आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव आणि किटाळी येथील क्षेत्राची पाहणी केली तसेच, धानोरा तालुक्यात काकडयेली येथील जिल्हा परिषद शाळेचे से. नं. ९६ ( सर्वे नंबर) आणि दुधमाळा येथील से. नं. २२० या ठिकाणच्या क्षेत्राला भेट देऊन जागेची सत्यता पडताळली सध्या धानोरा तालुक्यातील १३२ गावांमधील अतिक्रमित असलेले शेतकय्यांचे प्रस्ताव वन विभागाकडे पाठवण्याचे कामकाज सुरु असल्याची माहिती धानोराच्या तहसीलदारांनी दिली.

