आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम ठिकाणी सुरक्षेचे कायॽ

▪️आवागमन करणान्या नागरिकांसह विद्यार्थ्याना नाहक त्रास..

 

*🔸 उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा मुख्यालय तुन अलापाल्ली मार्ग सिरोचाकडे जाणान्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे रस्त्याचे बांधकाम सुरू अस्ताना सुरक्षेच्या‌ दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असते मात्र या रस्ता बांधकाम ठिकाणी कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली नसल्याने आवागमन करणान्य नागरिकांसह विद्यार्थ्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
सिरोचा आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची सतत वर्दळ असते सध्या या रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे बांधकामावरील वाहनांसह इतरही वाहनांची वर्दळ असते यातच याच मार्गोवर शैक्षणिक संस्थासह पेट्रोप पंप असल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वाहनांची रेलचेल सुरू असते असे असतानाही राष्ट्रीय महामार्गाचे बाधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
याच राष्ट्रीय महामार्गाला जोडणान्या कारसपल्ली जुन्या रस्त्या देखील एक शैक्षणिक संस्था आहे
येथेही रास्ता ओलांडताना विद्यार्थ्याना कमालीचा त्रास सहन करवा लागत आहे रस्ता बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडु नये, याकरिता बंरिकेटींगची ( सुरक्षा व्यवस्था) सुविधा करणे आवश्यक होते किमान शैक्षणिक संस्था असलेल्या ठिकाणी तरी संबंधित कंत्राटदारांची सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करावी अशी मांगणी सिरोंचा येथील नागरिकांकडून केली जात आहे या रस्त्यावरून धावणाच्या वाहनांची गति, चारचाकींची वर्दळ आणि शैक्षणिक संस्थांजवळील धोकादायक वळणे , यामुळे विद्यार्थ्याची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून शैक्षणिक संस्थांच्या परिसरात बैरैकेटिंग बसवावे, अशी मांगणी पालकांकडुन होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.