ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अवैध रेती वाहतूक करणारे ट्रैक्टर जप्त येनापुर मंडळ अधिकारी यांची करवाई..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चमोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : गोपनीय माहितीच्या आधारे जामगिरी येथे अवैध रित्या रेती वाहतुक करून मंदिराजवळ खाली करत असताना मारोडा येथील प्रदीप देवाजी बोरकुटे यांच्या मालकीचे रेतीले ट्रैक्टर येणापुर मंडळ अधिकारी नवनाथ कतारें ग्राम महसूलअधिकारी येणापुर तुषार झुरे यांनी ११ जानेवारी रोजी सकाळच्या‌ सुमारास जप्त केले आहे. ट्रैक्टर चालक संदीप देवजी बोरकुटे रा मारोडा हा वाहन मालक संदीप देवाजी बोरकुटे यांच्या सांगण्यावरून जंगलातील नाल्यामधून अवैध रेती वाहतुक करीत असल्याची माहिती येणापुर मंडळचे मंडळ अधिकारी यांना मिळाली
लगेच ग्राम महसूल अधिकारी तुषार झूरे यांना सोबत घेऊन तात्ळाळ जामगिरी येथे गेले असता जामगिरी येथील मंदिरा जवळ ट्रैक्टरमधील रेती खाली करतांना आढळून आला यावेळी वाहन चालकानेपथक पोहचल्यानंतरही जबरदस्तीने रेती खाली केली सदर घटनेचे व्हिडीओ व फोटो काढण्याय आले. मोक्यावर ट्रैक्टरचा पंचासमक्ष जप्तीनामा करून ट्रैक्टर तहसील कार्यालय चमोर्शी येथे लावण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.