ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️दारू तस्कराकडून ७ लाख रूपयांचा मुद्दे माल जप्त आष्टी पोलिसांची मोठी करवाई..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी, आष्टी। वाहनातुन दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी जयरामपुर जंगल परिसारात सापळा रचून वाहनासह ७ लाख २४ हजार रूपयांचा मुद्दे माल जप्त केल्याची घटना १० जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आष्टी पासुन १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जयरामपुर जंगल परीसारात घडली.
या प्रकरणी आरोपी आकाश शंकर पारखी (३०) रा मौलाना आझाद वार्ड मिलिंद चौक बल्लारपुर ता बल्लारपुर जिल्हा चंद्रपुर याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यत आला आहे
आरोपीकडून जुनी वापरती बोलेरो मैक्सीट्रक प्लस वाहन क्र एम एच ३३ टी २०५७ जप्त करण्यात आली आहे पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.


