आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मनिषा कांबळे सुप्रसिद्ध कवयित्री यवतमाळ यांना राज्यस्तरीय समाज गौरव व नारी पुरस्कार प्रदान..

▪️महाराष्ट्र राज्य ग्रामीण व शहरी श्रमीक इमारत बांधकाम कामगार संघ यांच्यावतीने..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

छत्रपती संभाजीनगर – ( इंडिया 24 न्युज ) : (औरंगाबाद) यांच्या व संत रविदास लोककला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१चा, राज्यस्तरीय समाज गौरव व नारी रत्न असे दोन्ही पुरस्कार यवतमाळ येथील सुप्रसिध्द कवयित्री श्रीमती मनिषा आनंदराव कांबळे यांना जालना जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण व शहरी श्रमीक इमारत बांधकाम कामगार संघ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चे सन्मानिय संस्थापक चेअरमन श्री महादुभाऊ सुरडकर यांच्या आदेशानुसार जालन्याच्या महिला शाहिरा लोककलावंत श्रीमती,सरलाताई पाटील सोळंके यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी चिफगेस्ट, म्हणून मा,श्री मदनराव कुलकर्णीसर माजी सोशल आमदार जालना ,व,ह,भ,प, राष्ट्रीयकिर्तनकार,
भारत सरकार,नवी दिल्ली,श्री,छगन,महाराज चव्हाण,भातोडीकर, जिल्हा जालना आणी श्री गणेश पाटील कोरडे महाराष्ट्र शासन लोककलावंत मुंबई, जेष्ठ महिला समाज सेविका
श्रीमती कौसल्याताई लोहकरे मॅडम कळमेश्वर नागपूर यांच्या उपस्थितीत देण्यात आला मनिषा कांबळे यांनी गेल्या १५, वर्षा पासून,कवि साहित्य कला नाट्यअशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र कामगार संघाचे अध्यक्ष श्री महादुभाऊ सुरडकर यांनी संपुर्ण कार्याची दखल घेतली व त्यांनां दोन्ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे आदेश प्रमुख पाहुण्याना दिले पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र पुष्पगुच्छ असुन हा अनोपचारीक पुरस्कार वितरण सोहळा हिंदी सांस्कृतिक सभागृह सीताबर्डी,नागपुर येथे दि,१०/जानेवारी २०२६रोजी, संपन्न झाला मनिषा कांबळे यांना दोन्ही पुरस्कार मिळाले बद्दल महाराष्ट्र तील,अनेक मान्यवर मंडळींनी अभिनंदन महा वर्षाव केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.