▪️केळझर या गावातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कर्मचाऱ्यांबाबत मागीतला खुलासा – मा. साईनाथ दशरथ लोनबले सामाजिक कार्यकर्ता

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*
मुल – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १३/१०/२०२५ ला मासिक सभेमध्ये विषय क्र. ७ अन्वये ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कर्मचारी नियुक्तीची चर्चांचा विषय ठेवण्यात आले होते. ग्रामस्थांनी व वाचनालयातील विद्यार्थ्यांना लक्षात येताच त्यांनी अर्ज ग्रामपंचायत ला सादर केले.पंरतू गैरप्रकार होवू नये. म्हणून मागील पाणीपुरवठा कर्मचारी यांचा खुलासा करावा.यासाठी मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती मूल यांना विचारणा केली असता ग्रामपंचायत नियमानुसार जाहिरात करून शिक्षण पात्र उमेदवारच घेण्यात येईल. व योजना दुत योजनेअंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचारी पद रद्द झाले. असुन ग्रामपंचायत नूसार कर्मचारी ठेवू शकतात. असे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा कर्मचारी योग्य तर्हेने विषय न हाताळल्या गेल्यास मा. साईनाथ दशरथ लोनबले सामाजिक कार्यकर्ता तथा राजकीय व ग्रामस्थांनी आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा दिला. गट विकास अधिकारी यांनी सुध्दा चुकीच्या पध्दतीने कर्मचारी नियुक्ती होणार नाही अशी ग्वाही दिली.



