ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

चंद्रपूरचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मान..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*

*🔸संपादक*

*🔸मो नं. 7030292628*

नवी दिल्ली – ( इंडिया 24 न्यूज ) दि. 24 ऑगस्ट 2025 चंद्रपूरचे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेशकुमार बोरकुटे साहेब यांना त्यांच्या समाजहिताच्या कार्याबद्दल नॅशनल एक्सीलेंस अवार्ड, इंटरनॅशनल प्रेस्टीज अवार्ड आणि भारत सम्मान अवार्ड 2025 अशा तीन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. नॅशनल एक्सीलेंस अवार्ड : आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन दिल्ली तर्फे, केंद्रीय मंत्री मा. श्री. रामदास आठवले यांच्या हस्ते. इंटरनॅशनल प्रेस्टीज अवार्ड : कितेश कॉर्पोरेट प्रॉडक्शन दिल्ली तर्फे, पद्मश्री बॅडमिंटन खेळाडू मिस. सायना नेहवाल यांच्या हस्ते. भारत सम्मान अवार्ड 2025 : ग्लोबल एक्सीलेंस फोरम दिल्ली तर्फे, अरुणाचल प्रदेश सरकारचे मंत्री मा. श्री. तागे टाकी यांच्या हस्ते.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. कपिल मिश्रा (कैबिनेट मंत्री, दिल्ली सरकार), मा. श्री. न्यातो दुकम (कैबिनेट मंत्री, अरुणाचल प्रदेश सरकार), मा. डॉ. रवींद्र नारायण बेहरा (सांसद), मा. डॉ. अलो लिबांग (अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्री सल्लागार), मा. जितेंद्र मणि, आयपीएस (डीसीपी, दिल्ली पोलीस), मा. सुश्री इरा सिंघल, आयएएस (सचिव, आरोग्य विभाग, अरुणाचल प्रदेश), मा. डॉ. संदीप मारवाह (भारतीय चित्रपट दिग्दर्शक व जागतिक अध्यक्ष, ग्लोबल एक्सीलेंस फोरम), मा. श्री. गोपालकृष्ण अग्रवाल (राष्ट्रीय प्रवक्ता, भाजप), तसेच मा. डॉ. जगन्नाथ पटनायक (कुलगुरू : आयसीएफएजे व कलिंग विद्यापीठ) तसेच या सोहळ्यास विविध राज्यांतील मंञी,खासदार,आयपीएस,आय एस अधिकारी तसेच शिक्षण व उद्योग क्षेञातील मान्यवरांची उपस्थित होती.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मा. श्री. जितेंद्र रवी, अध्यक्ष – ग्लोबल एक्सीलेंस फोरम यांनी केले. हा सन्मान चंद्रपूर जिल्ह्यासाठी व महाराष्ट्रासाठी मोठा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.