ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नवेगाव येथील महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न प्रकरण : पोलिसांची चौकशी सुरू, आरोपींना लवकरच अटक करण्याची मागणी..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

गडचांदूर – ( इंडिया 24 न्युज ) : (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) : दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी मुक्काम पोस्ट नवेगाव, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे सौ. कविता भीमप्रकाश आखेवार (वय 35 वर्ष) या मादगी समाजातील महिलेवर नामे कालिदास देशकर , रोशनी देशकर अनिल नगराळे व पौर्णिमा नगराळे यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची तसेच प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने शेतामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते बबलूजी आकेवार यांनी डॉ समाया पशूला जी संथापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मदगी संघटना यांना सुरुवाती पासून तसेच अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्री. शंकर पेगड पल्लीवार यांनी पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. मात्र, त्या वेळी पोलीस प्रशासनाकडून आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला नाही तसेच घटनास्थळी जाऊन चौकशीही करण्यात आली नसल्याची तक्रार करण्यात आली.
यानंतर पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी समाज संघटनेची मदत घेतली. समाज संघटनेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, महिला आयोग महाराष्ट्र राज्य तसेच मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथे डॉ. समय्या जी पशुला संथापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मदगी संघटनेच्या लेटरपॅडवर सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेत संबंधित विभागांकडून गडचांदूर पोलीस स्टेशनला मेलद्वारे निर्देश पाठविण्यात आले.
त्यानंतर दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. पोलिसांनी त्यांचे सविस्तर बयान नोंदवून रात्री सुमारे 8.30 वाजता पोलीस पथक, पीडित महिला, त्यांच्या कुटुंबीय व समाज संघटनेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नवेगाव येथे घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी व पडताळणी केली. घटनास्थळी मुकानामा करून प्राथमिक चौकशी करण्यात आली.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्वजण परत गडचांदूर पोलीस स्टेशन येथे आले. यावेळी पोलीस प्रशासनाने कालिदास देशकर, रोशनी देशकर, अनिल नगराळे व पौर्णिमा नगराळे या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती दिली.
या वेळी सहकार्य करण्यासाठी उपस्थित मान्यवर :
श्री डॉ. समयाजी पशुला – संथापक, अध्यक्ष, NCP उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य.
महाराष्ट्र राज्य
श्री. जयदेव जी त्रिसूलवार – प्रदेश उपाध्यक्ष,
शंकरजी चिट्टलवार – महासचिव, महाराष्ट्र राज्य
श्री शंकरजी बेगड परिवार – विदर्भ अध्यक्ष, अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटना
श्री सुभाष भाऊ चिंदेकर – सामाजिक कार्यकर्ते
श्री बबलूजी आखेवार – सामाजिक कार्यकर्ते
श्री अरुणजी पारखी – सचिव, तालुका कोरपना
तसेच मादगी समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने गडचांदूर पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते.
समाजात संताप :
या घटनेमुळे मादगी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून पीडित महिलेला न्याय मिळावा व आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनानेही प्रकरण गांभीर्याने घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.